वेल्हे तालुक्यात आरोग्यसेवेचा “बोजवारा”

नागरिकांचे हाल; आरोग्य सभापतींना निवेदन

वेल्हे: वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवेचा ढिसाळपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य केंद्रात अधिकारी उपलब्ध नसल्याने उपचारही घेता येत नाहीत. त्यामुळे खाजगी रुग्णलयांचा सहारा घ्यावा लागतो. मग प्रशासनाची आरोग्य सेवा असून तरी काय फायदा? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जावू लागला आहे.
प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा सरपाले येथील शं कर बढे यांना उपचार वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा भोर-वेल्हे तालुक्यातील आरोग्य सेवेचा गंभीर प्रश्न कायमचा सुटावा. यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांना शिवशंभू व एज्युकेशनल डेव्हलपमेंट ऑर्गनाझेशन ट्रस्ट वांगणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जनतेचा आरोग्य विषयी असणारे प्रश्न जर प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी ह्यांनी गांभीर्य ने घेतले नाही तर पुढील काळात ह्या उद्रेक तीव्र स्वरूपात असेल असा इशारा नागरिकांच्या वतीने यावेळी देण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी पवार ह्यांना संपर्क करून दोन दिवसात वेल्हे तालुक्यात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश सभापती माने यांनी यावेळी दिले.
या वेळी महेश भाई कदम ,संतोष चोरघे, गणेश चोरघे, श्रीकांत चोरघे, दत्ता चोरघे,अक्षय दिक्षीत, निलेश खामकर उपस्थित होते.

फोटो ओळ:
पुणे: जिल्हा परिषद येथे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांना निवेदन देताना ग्रामस्थ.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा