ओडिशामध्ये मराठी व्यापाऱ्याकडून १.२२ कोटी रुपये तर २० सोन्याची बिस्कीटं जप्त

5

ओडिशा, ११ ऑगस्ट २०२२: ओडिशातील उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील एक व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून तब्बल १.२२ कोटी रुपये व २० सोन्याची बिस्कीटंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. गंजम जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागानं लांजीपल्ली येथील गांजांच्या तस्करीची मोहिम सुरु केली होती.

कारवाई करत असताना बरहामपूर जवळ त्यांनी ही कारवाई केली. त्यामध्ये ११.२२ कोटी रुपये व सोन्याची बिस्कीटं ताब्यात घेण्यात आली आहे‌त. हा व्यक्ती ड्रग्ज डिलर असून तो महाराष्ट्रातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

दरम्यान, तो व्यक्ती महाराष्ट्रातील नेमका कोन आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तो व्यक्ती उद्योजक आहे की ड्रग्ज डिलर आहे हे स्पष्ट झालं नाही. याचा पुढील तपास ओडिशा पोलिस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा