राम मंदिर भूमिपूजनासाठी १.२५ लाख लाडू वाटप……

अयोध्या (उत्तर प्रदेश) ४ ऑगस्ट २०२० : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजना निमित्ताने पाटण्याचे महावीर मंदिर ट्रस्ट १.२५ लाखांहून अधिक रघुपती लाडूंचे वितरण करणार आहे.१.२५ लाख लाडूंपैकी ,५१,००० लाडू मंदिराच्या पायाभरणी समारंभानिमित्त रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला देण्यात येणार आहेत.

महावीर मंदिराचे विश्वस्त आचार्य किशोर कुणाल म्हणाले: “अयोध्येत भूमिपूजनाच्या निमित्ताने ‘रघुपती लाडू’ या नावाने १,२५,०० लाडू वाटप करण्यात येतील. ,५१,००० लाडू रामजन्म तीर्थ यांना देण्यात येणार आहेत.”उर्वरित लाडू बिहारमधील सीतामढी येथील जानकीच्या जन्मस्थळातील मंदिरात आणि जवळपास २५ तीर्थक्षेत्रांमध्ये पाठविले जातील.भगवान राम आणि हनुमानाच्या भक्तांमध्ये आणि विविध भागांमध्ये लाडूंचे वाटप देखील केले जाईल. बिहारमध्ये हे लाडू शुद्ध गाईच्या तूपाने बनवले जात आहेत. महावीर मंदिर ट्रस्ट, पटना यांनी यापूर्वी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला दोन कोटी रुपयांचे योगदान दिले आहे आणि ते राम मंदिराच्या निर्मितीसाठी एकूण १० कोटी रुपये देईल. ते म्हणाले, “आम्ही अयोध्येत रामभक्तांसाठी विनाशुल्क ‘राम रासोई’ चालवित आहोत. ‘

आचार्य किशोर कुणाल हे देखील अयोध्या येथील भूमिपूजनासाठी आमंत्रित आहेत ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचा पायाभरणी करतील. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारला राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्या येथील जागा सोपवण्याचे निर्देश दिले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा