जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका, २० जुलै २०२३ : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये बुधवारी मध्यरात्री भूमिगत गॅसचा स्फोट झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेटत एकाचा मृत्यू झाला तर ४१ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या स्फोटामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. घटनेत अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. या स्फोटांचा वेग किंवा जोर इतका जास्त होता की, काहीजण रस्त्यावरुन उडून गेले. जोहान्सबर्गमधील सार्वजनिक सुरक्षेसाठी महापौर समितीच्या सदस्यांनी सांगितले की, मध्यरात्री हा स्फोट झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी बचावकार्य तातडीने सुरू केले होते.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यामध्ये एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर घटनास्थळी किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांना प्राथमिक उपचार करुन सोडण्यात आले व गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर