गोल पोस्ट राष्ट्रीय ट्रॅव्हल्स उलटून १ मजूर ठार ;३१ जखमी

ट्रॅव्हल्स उलटून १ मजूर ठार ;३१ जखमी

नांदेड, दि.१९ मे २०२० : सोलापूर येथून बिहार राज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स लोहा तालुक्यातील खेडकरवाडी गावाजवळ उलटली. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला.
तर ३१ जण जखमी झाले असून ७ जण गंभीर जखमी आहेत.

ही घटना दि. १८ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. लाॅकडाऊन वाढत असल्यामुळे बाहेरील राज्यातील मजूर आपले घर जवळ करत आहेत.

सोलापूर येथून मजूरांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स (एम.एच.१३ ए.एक्स. ०१७४) बिहार राज्यातील आदी ठिकाणी जात होती. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील खेडकरवाडी जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली. यातील कृष्णा भोंगे (३१, रा. दमाणीनगर, सोलापूर) याचा मृत्यू झाला. इतर जखमींवर लोहा येथील शासकीय रुग्णालयात तर गंभीर जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version