या महिन्यात लॉन्च होणार १० आयपीओ, गुंतवणूकदारांना संधी

पुणे, २ जुलै २०२१: आयपीओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला या महिन्यात बऱ्याच संधी मिळतील, कारण या महिन्यात लॉन्चसाठी सुमारे १० आयपीओ उभे आहेत. ज्याद्वारे कंपन्या सुमारे १८ हजार कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहेत.

वास्तविक, जुलै महिना आयपीओने भरलेला आहे. जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (जीआरआयएल) या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा या महिन्याचा पहिला आयपीओ ७ जुलै रोजी सुरू होणार आहे. त्याची प्राइस बँड ८२८-८३७ रुपयांवर ठेवण्यात आली आहे.

झोमॅटो आणणार सर्वात मोठा आयपीओ

या महिन्यात झोमॅटोचा आयपीओ सर्वात मोठा असेल. झोमॅटो ८,२५० कोटी रुपयांचा आयपीओ आणेल. ही फूड डिलिव्हरी कंपनी आहे. झोमॅटो विषयी आपण सर्वजण जाणूनच असाल. या महिन्यातील गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित करणारा एक मोठा आयपीएल ठरेल. विशेष म्हणजे मागच्या महिन्यात देखील ५ कंपन्यांचे आयपीओ आले होते. हा महिना ही तसाच असणार आहे.

याशिवाय आयपीओमार्फत ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस १,८०० कोटी रुपये, क्लीन सायन्स १,५०० कोटी रुपये, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक १,३५० कोटी, कृष्णा डायग्नोस्टिक १,२०० कोटी, श्रीराम प्रॉपर्टीज ८०० कोटी, रोलेक्स रिंग्ज ६०० कोटी आणि तत्व चिंतन फार्मा ५०० कोटी रुपयांचे आयपीओ आणणार आहेत.

एकाच महिन्यात एवढे आयपीओ येण्याची आकडेवारी बघितली तर, या जुलैमध्ये एकूण १० आयपीओ सुरू होणार आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०१० मध्ये १५ कंपन्यांचे आयपीओ लॉन्च करण्यात आले होते. त्याचबरोबर ८ कंपन्यांनी सप्टेंबर २०२० मध्ये ७,१२८ कोटी रुपये आणि यावर्षी मार्चमध्ये ९ कंपन्यांनी ६,०८१ कोटी रुपये जमा केले.

जेव्हा जेव्हा एखादी कंपनी प्रथमच शेअर बाजारामध्ये सर्वसामान्यांना काही शेअर्स विकायची ऑफर देते तेव्हा या प्रक्रियेस इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) म्हणतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा