गोल पोस्ट आरोग्य ऑक्सफर्ड लसीच्या १० कोटी कुप्या पुढील महिन्यात भारतात उपलब्ध होणार..

ऑक्सफर्ड लसीच्या १० कोटी कुप्या पुढील महिन्यात भारतात उपलब्ध होणार..

नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर २०२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का करीत असून अंतिम टप्प्यातील चाचण्यांचे निकाल समाधानकारक येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने तयार केलेल्या कोविड १९ प्रतिबंधक ऑक्सफर्ड लसीच्या १० कोटी कुप्या पुढील महिन्यात भारतात उपलब्ध होणार आहेत. त्याच महिन्यात भारतात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का करीत असून अंतिम टप्प्यातील चाचण्यांचे निकाल समाधानकारक येण्याची अपेक्षा आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने यात १ अब्ज डोसच्या निर्मितीसाठी भागीदारी केली असून या कंपनीला डिसेंबपर्यंत लस निर्मितीचा परवाना मिळण्याची शक्यता आहे.

पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लस निर्मितीतील पहिल्या कुप्या या भारतातच वापरल्या जातील. पुढील वर्षी पूर्ण परवाना मिळाल्यानंतर ५०-५० प्रमाणात दक्षिण आशियाई देशांत लसीचे वितरण केले जाईल. गरीब देशांसाठी लस खरेदीचे काम जागतिक आरोग्य संघटनेची संस्था करणार असून सिरमने पाच विकसकांशी करार केला आहे. आतापर्यंत अ‍ॅस्ट्राझेन्का लसीचे ४ कोटी डोस दोन महिन्यांत उत्पादित करण्यात आले आहेत. नोव्हाव्हॅक्स इनकार्पोरेशनही लस निर्मितीच्या शर्यतीत आहे.

अ‍ॅस्ट्राझेन्काचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियॉट यांनी म्हटले आहे, की डिसेंबरमध्ये ब्रिटनने आपत्कालीन परवाना दिल्यानंतर लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version