शाळेतील जीमचे छत कोसळून चीनमध्ये १० जण ठार तर अनेकजण जखमी

किकिहार, चीन २४ जुलै २०२३ : चीनमधील किकिहार शहरात शाळेतील व्यायामशाळेचे काँक्रीटचे छत कोसळून १० जण ठार झाले आहेत. तर अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता आहे. अशी माहिती चीनमधील माध्यमांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेजारच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान जिमच्या छतावर आनावश्यक सामान टाकण्यात आले होते.

दरम्यान पावसाच्या पाण्यामुळे शाळेच्या जिमचे छत जड होऊन ते कोसळले असावे असा अंदाज आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम करणाऱ्यांना ताब्यात घेतले असुन या दुर्घटने संदर्भात तपास व बचावकार्य अजूनही सुरू आहे. किकिहार शहरातील ३४ मिडल स्कूलमध्ये असलेल्या जिममध्ये ही दुर्घटना घडण्यापूर्वी अंदाजे १९ ते २२ जण उपस्थित होते.

ज्यावेळी जिमचे छत अचानक कोसळले, त्यावेळी जिममध्ये असलेले लोक ढिगाऱ्याखाली सापडले. घटनेच्या वेळी या अपघातातून चारजण बचावले असून १५ जण अडकले आहे. आतापर्यंत १३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झालाय, तर चारजण गंभीर अवस्थेत आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा