गोल पोस्ट गुन्हा जमिनीच्या वादातून तक्रारदाराच्या वडीलास मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी

जमिनीच्या वादातून तक्रारदाराच्या वडीलास मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी

अंबड, जालना ४ मार्च २०२३ : अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री प्रल्हास सी भगुरे यांनी, आरोपी विष्णू ठकाजी तळेकर रा. शोभानगर ता अंबड जिल्हा जालना यास, जमिनीच्या वादातून तक्रारदाराच्या वडीलास जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणा वरून १० वर्षाची सक्त मजुरी व ३ लाखाचा दंड न भरल्यास अजुन सहा महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. इतर ७ आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

ही घटना २१ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. या प्रकरणी गोंडी पोलिसात तक्रार यांनी गु र न ३४०/२०२९ कलम ३०७ व इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात एकूण ८ जण आरोपी होते, ज्यात २ अपलवयीन बालके होती. ३०७ कलमा अन्वये आरोपी विष्णू ठकाजी तळेकर वय ५० याने व इतरांनी काठ्या कुऱ्हाडीने मारहाण केली होती. एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. ७ आरोपी विरुध्द सबळ पुरावा न आढळून आल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : शरद कापसे

error: Content is protected !!
Exit mobile version