पुण्यातील राजीव गांधी रुग्णालयात १०० खाटा, आरोग्य प्रमुख डॉ.पवार यांची माहिती

पुणे, १९ ऑगस्ट २०२३ : येरवडा परिसरातील महापालिकेचे राजीव गांधी रुग्णालय १०० खाटांचे करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. येत्या सहा महिन्यांत रुग्णालयातील आरोग्यसेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ.भगवान पवार यांनी दिली. राजीव गांधी रुग्णालय चार मजली असून, त्यात सध्या रुग्णसेवेसाठी ४५ खाटा उपलब्ध आहेत. प्रसूतिगृहासह बाह्यरुग्ण तपासणीची या ठिकाणी सोय आहे. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी हे रुग्णालय १०० बेडचे करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने आयुक्तांकडे सादर केला होता. त्यास नुकतीच मान्यता मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

रुग्णालयातील आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर डॉ.पवार यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, रुग्णालयात होणाऱ्या गरोदर महिलांच्या प्रसुतींची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच अल्पदरातमध्ये एमआयआर, सिटी स्कॅन, एनआयसीयू या सुविधादेखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. शंबर बेडचे हे रुग्णालय लवकरच जनरल हॉस्पिटल म्हणून ओळखले जाईल. असेही डॉ पवार यांनी यावेळी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा