पुणे: २१ जानेवारी २०२२; कोविड मुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले अनेकांची घरे उध्वस्त झाली, तर काही लोक परिस्थितीने डबघाईस आली.याच गोष्टी विचारात घेऊन राज्यसरकारने कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना ५० हजारांची मदत जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी देखील चालू केली आहे.
या अनुदानासाठी २० हजार जण पात्र ठरले असून लवकरच मृताच्या नातेवाईकांना अनुदान वितरित करण्याचे काम सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ५० हजारांचे अनुदान मंजूर झाले मात्र मृतांची संख्या जास्त असल्यामुळे आर्थिक भार जास्त असल्याने काम संथगतीने चालू होते, मात्र न्यायालयाने कडक भूमिका घेत सर्व राज्यांना तडक कारवाई करण्याचे निर्देश दिले, यासाठी आपत्ती प्रतिसाद निधीतूनही मदत दिली जाणार आहे.
नवे वेब पोर्टल सुरु;
अनुदानासाठी मंजूर केलेली हि सर्व रक्कम आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाच्या सचिवांच्या नवे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असून त्यानंतर संबंधित पात्र अर्जदाराच्या खात्यात अनुदानाची रक्काम जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवे वेब पोर्टल सुरु करण्यात आले असून त्या वेब पोर्टल वर ऑनलाइन अर्ज कसा करावा व योजनेची तपशीलवार माहिती देण्यात आली असून त्याचा फायदा नक्कीच अर्जदाराला होणार आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी ; किरण कानडे.