नीरा येथील १२ वी चा १०० टक्के निकाल.

पुरंदर, दि.१६ जुलै २०२० : आज लागलेल्या बारावीच्या निकालामाध्ये नीरा येथील रयत संकुलातील, सौ.लीलावती शहा कन्या कनिष्ठ महाविद्यालयचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९९.३० टक्के व कला शाखेचा ८९.०९ टक्के निकाल लागला आहे. कालाचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेत शिवम अर्जुन जगदाळे ८८.३० टक्के व विज्ञान शाखेची कु. मिसबा सलीम शेख ८३.६९ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली आहे.

नीरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. बारावी विज्ञान शाखेत एकूण १९ विद्यार्थिनी प्रविष्ट होत्या. सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. पहिले तीन क्रमांक पुढील प्रमाणे कु. नरुटे स्नेहा सचिन ६१.५ %, कु. धुमाळ सायली नामदेव ५७ %, कु. निगडे साक्षी दत्तात्रेय ५४.६% .

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेमध्ये १४४ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर महाविद्यालयाचा ९९.३० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचे पहिले तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे कु. शेख निजबा सलीम ८३.६९ टक्के, जाधव गौरव दादा ७८.७६ टक्के व पवार अभिषेक समीर ७६.१५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

कला शाखेचे एकुण १०९ विद्यार्थी बसले होते, पैकी ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.०९ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत अव्वल क्रमांक पटकवून जे पहिले तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची नावे आहेत, जगदाळे शिवम अर्जुन ८८.३० टक्के, कु. काकडे धनश्री संजय ८८.०७ टक्के, कु. दानवले पल्लवी महादेव ८५.३९ टक्के.

महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख थिटे, पर्येवेक्षक जयंतकुमार दाभाडे तसेच, लिलावती रिखवलाल शहा कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा बोडरे व पर्यवेक्षक उत्तम काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा