टेंभुर्णीच्या महात्मा फुले विद्यालयाचा निकाल १०० %

माढा, २९ जुलै २०२० : माढा तालुक्यातील टेंभुर्णीयेथील इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून हि यशाची परंपरा चार वर्षे झाली चालू आहे.

बुधवारी दुपारी एक वाजता एसएससी बोर्डाने निकाल जाहीर केला, आणि महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली.

एकूण १४६ विद्यार्थ्यांपैकी सर्व १४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा त्यांनी कायम राखली.

टेंभुर्णीच्या तिन्ही केंद्रात महात्मा फुले विद्यालयाचे २ विद्यार्थी सर्वप्रथम आले असून, गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन विद्यालयाचे दोन विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वप्रथम आले .

१) मधुरा संतोष रसाळ ९६.८०%
२) भाग्यश्री शशिकांत अनपट ९६.८०%
३) तृप्ती बळीराम कुटे ९६.२०%
४) प्रणिता गुरुदास गोयकर ९६.२०%
५) राहुल मदन जगताप ९६.२०%
६) उत्तरा रवींद्र नांदुरके ९५.६०%
७) साक्षी जगन्नाथ काळे ९५.४०%
८) प्रतीक सोमनाथ जाधव ९५.००%
९) उमेश संतोष शिंदे ९५.००%
१०) मयुरी विनोद देशमुख ९५.००%
११) तृप्ती बळीराम कुटे गणित १०० पैकी १०० गुण
१२) ओमकिरण खंडू क्षिरसागर गणित १०० पैकी १०० गुण.
तसेच विद्यालयाचे ३७ विद्यार्थी ९०% गुणांच्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयाचे १०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नारायण भानवसे,शाळेचे मुख्याध्यापक विजय यादव , शोएब बागवान, शरद जाधव सर, विनोद जाधव, अशोक काळे, भीमराव नवगिरे, प्रियांका टाकळे , अनंत घळके, सचिन खडके, नागेश सुक्रे ,तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

न्युज अनकट प्रतिनिधी :प्रदीप पाटील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा