पुणे, २४ सप्टेंबर २०२३ : भारतीय हवामान खात्यानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १० हजार घरांचे नुकसान झाले. याशिवाय अनेक भागात वीज पडण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रातील नागपुरात आलेल्या पुरानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे, त्यामुळे १० हजार घरांचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांना भरपाई जाहीर केली. आयएमडीने नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज म्हणजेच रविवार, २४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, ईशान्य राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, येथे हलका पाऊस पडू शकतो. याशिवाय पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंडचा काही भाग, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत आज म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याशिवाय आज पश्चिम आसाम, मेघालय, दक्षिण मध्य प्रदेश, पूर्व गुजरात, दक्षिण-पूर्व राजस्थान आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, छत्तीसगड, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह एक किंवा दोन जोरदार सरी पडू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड