१०३ वर्षांच्या कॅन्सरग्रस्त आजींची घरी राहून कोरोना वर मात

इंदौर, ४ ऑगस्ट २०२०: संपूर्ण जग कोरोना रोगाच्या विळख्यात आहे. तरुण, वृद्ध सर्वच लोक या रोगामुळे हैराण आहेत. अशातच इंदोैर मध्ये अशी एक घटना घडली आहे. जी प्रत्येकाला प्रेरणा देऊन जाईल. चक्क १०३ वर्षांच्या आजीने कोरोना सारख्या रोगावर मात केली आहे. त्यात मुख्य बाब म्हणजे घरी राहूनच या रोगावर त्यांनी विजय मिळवला. आजकाल परिस्थिती इतकी वाईट आहे. साधं कोणी खोकला तरी कोरोना आठवतो. यात या आजीने केलेला पराक्रम पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळेल.

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यामध्ये बडवाह येथे राहणाऱ्या रुक्मिणी चव्हाण या १०३ वर्षांच्या महिला अंडाशय कर्करोगाशी झुंजत होत्या. त्यातच त्यांना २१ जुलै रोजी कोरोनाचे संक्रमण झाले. आजींनी घर राहून उपचार घेतले आणि सोमवारी त्यांनी कोरोनावर मात केली. देशात या महामारीतून बऱ्या होणाऱ्या वयस्कर व्यक्तींमध्ये आजींचा समावेश झालेला आहे.

विकासखंडचे गट वैद्यकीय अधिकारी अनुज कारखुर यांनी सांगितले की, बडवाह येथे राहणाऱ्या वयस्कर महिला रुक्मिणी चव्हाण यांना २१ जुलै रोजी कोरोनाचे संक्रमण झाले. पण त्यांच्यामध्ये याची लक्षणे दिसून आले नाही. मग आम्ही त्यांचे विलीगिकरण करून त्यांच्यावर घरीच उपचार केले.

रुक्मिणी यांच्या घरातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वय १०३ वर्ष आहे. काही दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत आहे आणि मागील पाच वर्षांपासून त्यांना क्षयरोग झालेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून त्यांची काळजी घेत होतो.

त्यांच्या म्हणण्यानुसार ते आजीला कोरोनाची औषध आणि काढा देत असत. याचमुळे त्यांच्या शरीरातील तापमान आणि ऑक्सिजन पातळी यांच्यामध्ये बदल होत होते. याच पद्धतीने आम्ही त्यांच्यावर उपचार केले आणि सोमवारी त्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाल्या. आता त्यांना कोरोना संदर्भातील कोणतीही समस्या नाही, अशी माहिती गट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावर‌ॆ.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा