गोल पोस्ट आरोग्य पुणे विभागात १०८५ रुग्ण कोरोना बाधित: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात १०८५ रुग्ण कोरोना बाधित: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०८५ झाली आहे. विभागात १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ८३१ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ७३रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात १०८५ बाधित रुग्ण असून ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ९८५ बाधीत रुग्ण असून ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २१ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ४१ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २८ बाधीत रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण १२ हजार ७५५ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२हजार ८६ जणांचा अहवाल प्राप्त आहे. ६६९ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १० हजार ९३९ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ४९ लाख ५८ हजार ९७७ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत १ कोटी ९१ लाख १६ हजार ४६४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९८९ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version