दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते शनिवारी भारतात दाखल होणार

मध्य प्रदेश, १५ फेब्रुवारी २०२३ : दक्षिण आफ्रिकेतून मागविलेले १२ चित्ते शनिवारी भारतात दाखल होणार आहेत. या चित्त्यांना देखील नामिबियातून आणलेल्या ८ चित्त्यांप्रमाणेच मध्य प्रदेशातील कुनो नॅनशल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. भारताच्या चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पाशी संबंधित व्यनजीव तज्ज्ञांनी याची माहिती दिली. या १२ चित्त्यांपैकी ७ नर आणि ५ मादी आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी हे चित्ते दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग येथील टॅम्बो आंतराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानातून भारताकडे रवाना केले जातील. हे चित्ते शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर पोचतील. त्यानंतर त्यांना IAF हेलिकॉप्टरद्वारे १६५ किमी अंतरावर श्योपूर जिल्ह्यातील केएनपी येथे नेले जाईल.

कुनो येथे पोचल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास बोमामध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी सांगितली आहे.
केएनपीचे संचालक उत्तम शर्मा म्हणाले, की त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांसाठी १० अलग ठेवलेल्या ‘बोमा’ची स्थापना केली आहे. यातील दोन सुविधांमध्ये चित्त्यांच्या दोन जोड्या ठेवण्यात येणार आहेत.

प्रत्येक चित्त्यामागे भारताकडून ३००० डॉलर घेण्यात आले आहेत. हे एकूण १२ चित्ते आहेत. थोडक्यात, ३६००० डॉलर या चित्त्यांसाठी भारत सरकारने दक्षिण आफ्रिकेला दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील हे चित्ते गेल्यावर्षीच येणार होते. तशी योजना सरकारकडून आखण्यात आली होती; मात्र दोन्ही देशांतील करारावर स्वाक्षरी न झाल्याने यासाठी विलंब झाला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा