केवळ दोन महिन्यांत उघडली गेली १२ लाख डीमॅट खाती

मुंबई, दि. १७ मे २०२०: कोरोना विषाणूमुळे देशभरात तब्बल दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे, पण या संकटाच्या काळातही बऱ्याच लोकांनी स्वत: साठी कमाईच्या संधी शोधले आहेत. बरेच लोक घरामध्ये लॉकडाऊनमध्ये मोकळ्या कालावधीत स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करुन स्टॉक मार्केटमधून पैसे कमवत आहेत. यावरून याचा अंदाज बांधला जाऊ शकतो की गेल्या दोन महिन्यांत देशात सुमारे १२ लाख डिमॅट खाती उघडली गेली आहेत. शेअर बाजाराच्या व्यापारासाठी डिमॅट खाते उघडणे आवश्यक आहे.

यापूर्वी लोक आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला होता परंतु, कामात व्यस्त राहिल्यामुळे त्यांना यात येण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता गेल्या दोन महिन्यांपासून देशांमध्ये लॉक डाऊन असल्यामुळे लोकांकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे आता लोक शेअर मार्केट कडे वळताना दिसत आहेत. लोकं आता याविषयी जास्त जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे सध्या मार्केटमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर खाली घसरले आहेत. मार्केटचे पडणे हे एक सुवर्णसंधी मानली जात आहे. त्यामुळे गुंतवणुकदार देखील आता शेअर मार्केटमध्ये कमी किमतीमध्ये चांगल्या कंपन्यांचे शेअर घेऊन ठेवत आहेत. जेणेकरून हे संकट संपल्यावर मोठा फायदा मिळू शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा