तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या १२ रेल्वेगाड्या रविवारी रद्द

पुणे, १९ ऑगस्ट २०२३ : रविवारी पुण्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या एकूण १२ रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत.

चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या १२ गाड्या तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या १२ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव,डेक्कन एक्सप्रेस,कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्यादेखील रविवारी धावणार नाहीत.

यामध्ये पुणे-लोणावळा (वेळ ७.१५),पुणे-तळेगांव (वेळ ७.३८),शिवाजीनगर-लोणावळा (वेळ ८.५०) पुणे-तळेगांव (वेळ ९.४३),पुणे-लोणावळा (वेळ १०.४२),पुणे-लोणावळा (वेळ १२.०२), पुणे-लोणावळा (वेळ १५.४५),डेक्कन एक्सप्रेस (वेळ १५.५७),पुणे-तळेगांव (वेळ १६.३२), कोयना एक्सप्रेस (वेळ १६.४२), पुणे-लोणावळा (वेळ १७.१०),शिवाजीनगर-लोणावळा (वेळ १७.५६) या गाड्यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा