गोव्यातील धारबोंदाडा येथे १२० जिलेटीनच्या कांड्या आणि ३०० डेटोनेटर्स जप्त

मडगाव, गोवा २० जुलै २०२३: दक्षिण गोव्याच्या धारबोंदाडा येथे गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून १२० जिलेटीनच्या कांड्या आणि सुमारे ३०० डेटोनेटर्स असलेली कार पकडली आहे. बुधवारी मध्यरात्री घातलेल्या या धाडीमुळे दक्षिण गोव्यात खळबळ माजली असून, ह्या सर्व स्फोटकांचे कनेक्शन सावर्डेतील गुडुमळ येथे आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिलेटीनच्या १२० कांड्या आणि सुमारे ३०० डेटोनेटर्स बाळगल्याप्रकरणी मोहम्मद तांबोळी (३५) आणि भुजंग बाळा खटावळ (३२) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही महाराष्ट्रातील रहिवाशी आहेत. डेटोनेटर्सचे सहा बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ही स्फोटके सावर्डे भागात बेकायदेशीर पाषाणाची खाण चालवणाऱ्या व्यवसायिकाकडे नेली जात होती.

पोलीस अधिक्षक निधीन वाल्सन आणि अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक किशोर रामानन यांनी पथकांसह ही कारवाई राबविली आहे. बाजारपेठेत या स्फोटकांची किंमत सुमारे पन्नास हजार एवढी आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी निरीक्षक लक्षी आमोणकर तपास करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा