गोल पोस्ट आरोग्य पुणे विभागात १२०० कोरोनाबाधित रुग्ण : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात १२०० कोरोनाबाधित रुग्ण : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे,दि. २५ एप्रिल २०२० : पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२०० झाली असून विभागात १८४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. संक्रमित रुग्ण ९३९ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात १२०० बाधित रुग्ण असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात १०९४ बाधीत रुग्ण आहेत.त्यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २६ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ४२ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २८ बाधीत रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण १३ हजार ६९३ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १३ हजार ७० जणांचा अहवाल प्राप्त आहे. ६२३ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ११ हजार ८१२ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १२०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ५१ लाख ३६ हजार ८४५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत १ कोटी ९८ लाख १४ हजार ६३९ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १०६७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version