गोल पोस्ट इतर शुभेच्छा उत्कृष्ट तपासाबद्दल १२१ पोलीस अधिकारी- कर्मचारी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकानं सन्मानित

उत्कृष्ट तपासाबद्दल १२१ पोलीस अधिकारी- कर्मचारी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकानं सन्मानित

मुंबई, १३ ऑगस्ट २०२० : केंद्रीय गृहमंत्रालयानं उत्कृष्ट तपासाबद्दल यंदा १२१ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या पदकानं सन्मानित केलं असून, त्यात राज्यातल्या दहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर, पोलीस उपअधिक्षक नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी पवार, समीर शेख, किसन गवळी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, तसंच पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकाडे, उत्तम सोनावणे आणि कोंडीराम पोपेरे यांना हे पदक मिळालं झाला आहे.

पदक विजेत्यांमधे सीबीआयच्या १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, तसंच २१ महिला पोलिसांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version