१२१ रुपये भरा अन लग्नासाठी पैसे जमवा

54

नवी दिल्ली : प्रत्येक पालक हा आपल्या मुलींच्या भवितव्याबद्दल काळजी करत असतात. मुलगी जन्माला येताच त्यांच्यासाठी काही तरी चांगले देण्याचा त्यांचा विचार असतो. फुल ना फुलाची पाकळी म्हणून तिच्यासाठी काही तरी जमा करण्याच्या विचारात पालक असतात. त्यामुळे एलासीने असेच एक धोरण मुलीच्या लग्नासाठी बनवले आहे. LIC ने मुलींच्या लग्नासाठी खास ‘कन्यादान योजना’ पॉलिसी तयार केली आहे. या योजनेत दररोज १२१ रुपये याप्रमाणे महिन्याला ३६०० रुपयांच्या प्रीमियमवर ही पॉलिसी मिळते.
कन्यादान पॉलिसीत दररोज १२१ रुपयांप्रमाणे पैसे भरल्यास २५ वर्षांनी २७ लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी घेतल्यानंतर जर मृत्यू झाला तर कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही आणि दरवर्षी एक लाख रुपयेही दिले जातात.
तसेच २५ वर्ष पूर्ण झाल्यावर वारसांना २७ लाख रुपये मिळतात.
यासाठी असणारी वयाची अट : LIC ची ही पॉलिसी घेणाऱ्याचे वय कमीत कमी ३० वर्ष असावे तसेच मुलीचे वय १ वर्ष असावे. ही पॉलिसी २५ वर्षांसाठी असली तरी प्रीमियम फक्त २२ वर्ष भरावा लागेल. पॉलिसी घेणाऱ्याच्या आणि मुलीच्या वयानुसारदेखील पॉलिसी मिळते. मुलीच्या वयानुसार पॉलिसीची मुदत कमी केली जाऊ शकते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा