देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,९२३ नवीन प्रकरणे, १०८ मृत्यू

नवी दिल्ली, ११ फेब्रुवरी २०२१: देशातील कोरोना साथीच्या आजाराची परिस्थिती वेगाने सुधारत आहे.  देशात कोरोनाची सक्रिय प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. यासह, रिकव्हरी दर वेगाने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात १२,९२३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात १०८ लोक मरण पावले आहेत.
 आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोना विषाणूचे एकूण १ कोटी ८ लाख ७१ हजार २९४ रुग्ण आढळले आहेत. तथापि, कोरोना पासून १ कोटी ५ लाख ७३ हजार ३७२ लोक बरे झाले आहेत. भारतात सध्या कोरोनाचे १ लाख ४२ हजार ५६२ रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना मुळे आतापर्यंत एकूण १ लाख ५५ हजार ३६० लोकांचा मृत्यू झाला आहे.
 रिकव्हरी दर वाढला
 देशात कोरोनाच्या रिकव्हरीचे प्रमाण वाढले आहे.  गेल्या २४ तासांत कोरोना मधून एकूण ११,७६१ लोक बरे झाले आहेत. यामुळे रिकव्हरी दर ९७.२६% वर आला आहे.  गेल्या २४ तासांत देशात कोरोनाची १०५१ सक्रिय प्रकरणे झाली आहेत.  यासह सक्रिय दर १.३१% पर्यंत कमी केला गेला आहे.  भारताचा कोरोना मृत्यू दर १.४३% आहे.
 देशात कोरोना चाचणीची संख्या झपाट्याने वाढत आहे.  आतापर्यंत देशात २०.३० कोटींपेक्षा जास्त कोरोना टेस्ट  करण्यात आल्या आहे.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी (१० फेब्रुवारी, २०२१) पर्यंत देशात २०,४०,२३,८४० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी काल ६,९९,१८५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा