मुंबई, २५ मे २०२३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. तर १७ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्क्यांनी जास्त लागला आहे. तर दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे.
राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के लागला आहे.
राज्यातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे. मुली ९३.७३ टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे.
राज्यातील बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे,पुणे : ९३.३४ टक्के, नागपूर : ९०.३५ टक्के, औरंगाबाद : ९१.८५ टक्के, मुंबई : ८८.१३ टक्के, कोल्हापूर : ९३.२८ टक्के, अमरावती : ९२.७५ टक्के, नाशिक : ९१.६६ टक्के, लातूर : ९०.३७ टक्के, कोकण : ९६.२५ टक्के
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर