नागालँड, 6 डिसेंबर 2021: नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झालाय. हे लोक एनएससीएन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या भीतीनं सुरक्षा दलांनी गोळीबार केला, ज्यामध्ये या लोकांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात हिंसाचार पसरला. सुरक्षा दल आणि स्थानिक लोकांमध्ये हिंसक चकमकही झाली. या कारवाईत सुरक्षा दलाचे जवान गंभीर जखमी झाल्याचं आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यादरम्यान एक जवान गंभीर जखमी झाला, त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजप नेत्याच्या मित्राचा मृत्यू
नागालँडमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष न्यावांग कोन्याकी यांनी लष्करावर गोळीबार केल्याचा आरोप केलाय. मोन जिल्ह्यातील भाजप नेत्याने सांगितलं की ते शनिवारी कुठेतरी जात होते, त्यावेळी लष्कराने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या साथीदाराचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांना बंडखोर समजले
अहवालानुसार, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलांनी तिरू-ओटिंग रस्त्यावर घात केला होता. त्याच वेळी, त्यांनी चुकून गावकऱ्यांना बंडखोर समजलं. वास्तविक, इनपुटमध्ये नमूद केलेल्या त्याच रंगाची कार जवळून गेली. सैनिकांनी गाडी थांबवायला सांगितली, पण ती थांबली नाही. यानंतर सुरक्षा दलांनी गोळीबार सुरू केला.
संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या वाहनांना लावली आग
मृत सर्व मजूर असल्याचं सांगण्यात येत आहे, ते काम संपवून पिकअपमधून आपल्या घरी जात होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला असता त्यांना घटनेची माहिती मिळाली. संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलांची वाहनं जाळली. संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सैनिकांना खूप संघर्ष करावा लागला.
सीएम नेफियू म्हणाले – उच्चस्तरीय एसआयटी तपास होईल
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ म्हणाले की, मोन के ओटिंगमध्ये नागरिकांच्या हत्येची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. त्याची उच्चस्तरीय एसआयटी चौकशी केली जाईल. कायद्यानुसार सर्वांना न्याय मिळंल. त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे