एजन्सी देण्याच्या नावाखाली १३ लाख ८८ हजारांची फसवणूक

बारामती, २ फेब्रुवरी २०२१: एच. पी. गॅसची एजन्सी देण्याच्या नावाखाली मोबाईलद्वारे संपर्क साधत १३ लाख ८८ हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नितीन विलास सकाटे (रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. संजय अग्रवाल, राकेशसिंह, राघवेंद्रसिंह व शिवमकुमार (पू्र्ण नाव, पत्ते नाहीत) अशी आरोपींची नावे आहेत. दि.१८ जून २०२० ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली.

आरोपींनी मोबाईलद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. आम्हाला एचपी गॅस वितरणाची एजन्सी द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडील वेगवेगळ्या सात खात्यांवर वेळोवेळी १३ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम भरायला लावली. परंतु त्यानंतर संपर्क बंद केला. तसेच एजन्सीही दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सकाटे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा