मे पर्यंत १३लाख भारतीयांना कोरोना होण्याची भीती : शास्त्रज्ञांचे मत

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याचे समोर येत आहे. तसेच भारत सरकारने कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. लॉकडाऊन असे असले तरी शास्त्रज्ञांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस शास्त्रज्ञांनी स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
याबाबत शास्त्रज्ञांनि एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल १३ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाबाबात शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कमी टेस्ट केल्या आहेत. ही संख्या इतर देशांपेक्षा भारतात कमी आहे.
१८ मार्चपर्यंत भारतात केवळ ११ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळं ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

एका भारतीय शास्त्रज्ञांनी मेडियम या माध्यमावर, “COVID-19 च्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यांतून तिसऱ्या टप्प्यात गेल्या नंतर याचा परिणाम भारताच्या आरोग्या सेवा प्रणाली होईल. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखणे कठिण होईल”, असे सांगण्यात आले आहे.

असाच काहीसा प्रकार अमेरिका आणि इटलीमध्ये घडला. दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाताना इटलीमध्ये तिपटीने कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली.

अपुऱ्या सुविधा..
भारतातील लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे सोयी सुविधा कमी आहेत. भारतात सध्या १००० लोकांसाठी केवळ ०.७ बेड आहेत. तर फ्रान्समध्ये ६.५ , दक्षिण कोरिया ११.५, चीन ४.२, इटली २.९आणि अमेरिका २.८ त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती बिकट झाल्यास चिंतेचे वातावरण निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा