पुणे: ऑन ड्यूटी २४ तास म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर खाकी वर्दीतला पोलीस उभा राहतो. ज्यांना सणवार असा प्रकार माहितीच नसतो. ते नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर उभे असतात. यातच काही समाधान म्हणजे महाराष्ट्र पोलीस आयोजित १३ वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा. ज्यामध्ये पोलिसांचे युद्ध कौशल्य आणि त्यांच्या अंगी असलेल्या खिलाडू वृतीचे वेगळेपण दाखवण्याची त्यांना संधी मिळते. पुण्यातील म्हाळुंगे– बालेवाडी आणि उंड्री जवळ १३ वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा यावर्षी पुण्यात पार सुरू आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्याचा पोलीस दलांचा यात सक्रीय सहभाग पाहायला मिळत आहे.
यंदाच्या वर्षी या स्पर्धेत महिला पोलिसांचा देखील या स्पर्धेत उत्साह पहायला मिळाला. या स्पर्धेत २७ संघ व ५६० स्पर्धेक सहभागी झाले आहेत, तर यामध्ये १६३ महिलांचा समावेश आहे.
स्पर्धक ज्या संख्येने होते त्या पेक्षा जास्त उर्जा तेथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पहायला मिळाली. म्हणजे एका स्पर्धकामागे संपूर्ण पोलीस बटालियन होती. (स्पर्धकाचा उत्साह वाढविण्यासाठी) अश्या सकारात्मक वातावरणात हि स्पर्धा पार पडत आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
३०० मीटर बीग बोर रायफल प्रोन (पुरुष) सुर्वण : (सी.आय.एस.) पी. के. वैष्णव (५८७.०)
रौप्य : (राजस्थान) विरेंद्र चौधरी (५८५.०)
कांस्य : (आय.टी.बी.) विरेंद्र प्रकाश (५८१.०)
(सांघिक गट) ३०० मीटर बीग बोर रायफल प्रोन (पुरुष)
सुवर्ण : (सी.आय.एफ.एस.) १७२९.० ( पी. के. वैष्णव ५८७.०,सुधीर कुमार ५७६.०,भिमसिंग रावत ५६६.०)
रौप्य : (राजस्थान) १७१६.० ( विरेंद्र चौधरी ५८५.०, शिवराज ५७२.०, राकेश ५५९.०)
कांस्य : (सी.आर.पी.एफ.) १७१०.० (साफी मोहम्मद ५७९.०, परविन ५६९.०, शैलेश कुमार सिंग ५६२.०)
३०० मीटर बीग बोर रायफल प्रोन (महिला)
सुर्वण : (सीआरपीएफ) मिरा सिंग (५७७)
रौप्य : (तेलगांणा) सी एच माधवी(५७५)
कांस्य : (तेलगांणा) कुमारी शर्मा (५७३)
(सांघिक गट) ३०० मीटर बीग बोर रायफल प्रोन (महिला)
सुवर्ण : (सी.आर.पी.एफ.) १७१४.० (मिरा सिंग ५७७.०, कुमारी शर्मा ५७३.०, मनशा मांडवी ५६४.०)
रौप्य : (तेलगांणा) १७०५.०(व्ही सुर्वणा ५७५.०,सी एच माधवी ५७३.०, एम विजयाम्मा ५५७.०)
कांस्य : (बीएसएफ) १६७२.० (मनप्रीत कौर ५७०.०, नितू उज्जवल ५६०.०, संदीप कौर ५४२.०)
(पुरुष) ५० मीटर फ्री रायफल प्रोन
सुवर्ण : (बीएसएफ) समशेर सिंग (६१८.३)
रौप्य : (सीआरपी) मलिक खान (६१६.९)
कांस्य : (सीआरपी) रामस्वरूप(६१६) (सांघिक गट) ५० मीटर फ्री रायफल प्रोन (पुरुष)
सुवर्ण : (सीआरपी) १८४८.२ (मलिक खान ६१६.३,रामस्वरूप ६१६.०, साफी मोहम्मद ६१५.३)
रौप्य : (सीआयएस) १८३४.३ (नवदिप सिंग राठोरे ६१४.५,पी के वैष्णव ६१३.१, एकंबीर सिंग मंडी ६०६.३)
कांस्य : (बीएसएफ) १८३१.८ (समशेर सिंग ६१८.३, विमलेश सिंग राठोड ६०७.२, प्रजापती कुमार ६०६.३)
(पुरुष) २५ मीटर एसटीडी पिस्टल
सुर्वण : (सीआयएसएफ) समरेश जंग(५६२.०)
रौप्य : (आयटीबीपी) प्रदीप सिंग(५५७.०)
कांस्य : (आईटीबीपी) मानवेंद्र चौधरी(५५६.०)
(सांघिक गट) २५ मीटर एसटीडी पिस्टल (पुरुष)
सुवर्ण : (आयटीबीपी)१६६५.०(प्रदिप सिंग शेखावत ५५७.०,मानवेंद्र चौधरी ५५६.०,मनिष राणा ५५२.०)
रौप्य : (पंजाब) १६३४.०(बलजीत सिंग ५४३.०,अक्षय जैन ५४०.०,अजितेश कौशल ५५१.०)
कांस्य : (सीआरपी) १६३१.०(अतंरिक दत्ता ५५१.०,सुरेश माळी ५४१.०,लहु गायकवाड ५३९.०)
(महिला) १० मीटर एयर रायफल
सुवर्ण :(केरळ) किर्ती के सुसलीन (६२६.४)
रौप्य :(पंजाब) अंजूम मोगदिल (५२३.६)
कांस्य :(सीआरपी) पुनम देवी (६१८.७)
(सांघिक गट) १० मीटर एयर रायफल (महिला)
सुवर्ण : (सीआरपी) १८४६.३ (पुनम देवी ६१८.७,कुमारी किर्ती ६१८.५,अंजू कुमारी ६०९.१)
रौप्य : (बीएसएफ)१८३९.१(गाडलींग कोमल ६१४.१,प्रिया सुरण ६१३.४,रुबीना ६११.६)
कांस्य : (पंजाब) १८३६.५ (अंजूम मोगदिल ५२३.६,रंजनी ६०७.६,गुरमीत कौर ६०५.३)
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला (विशेष पोलीस महानिरीक्षक/संचालक महाराष्ट्र गुणवत्ता प्रबोधिनी पुणे) प्रदीप देशपांडे आणि (पोलीस उप ममहानिरीक्षक/पुणे परिक्षेत्र) नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली व विजेत्या स्पर्धकांचे पदके देऊन गौरव केला आणि त्या बरोबरच होणाऱ्या स्पर्धेबद्दल आपले मनोगतही व्यक्त केले.
या स्पर्धेचा कार्यभार आर. बी. केंडे (पोलीस समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० सोलापूर), एस. एन. सय्यद (पोलीस साह्यक समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे), बी. टी. लोहार (पोलीस निरीक्षक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ पुणे), एस. जी. गायके (पोलीस निरीक्षक फोर्स वन पुणे), मनिष कल्याणकर (पोलीस निरीक्षक देहूरोड पुणे), आर. बी. वेटेकर (पोलीस निरीक्षक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे) नांदूरकर (पोलीस निरीक्षक पुणे शहर) हे पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहात पार पाडत आहे.