मुंबई, दि. १७ जून २०२० : राज्यात २४ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळामध्ये लॉकडाऊनचे नियम मोडल्यामुळे तसेच संचार बंदीचे उल्लंघन केल्यामुळे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचा तपशील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
लॉकडाऊनच्या काळात १ लाख ३० हजार गुन्ह्यांमध्ये २६ हजार ८८७ व्यक्तींंना अटक करण्यात आली आहे. याच बरोबर ७ कोटी ६५ लाखांचा दंड संबंधित गुन्ह्यांमध्ये वसूल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८५ हजार ई-पासचे वितरण आतापर्यंत करण्यात आले आहे. राज्यात ६ लाख १७ हजार २४२ व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच राज्यात १३४ रिलिफ कॅम्पमध्ये ४ हजार ४३७ लोकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात कोविड -१९ बाधित २०४ पोलीस अधिकारी तसेच याबरोबर ११९५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. या कोविड -१९ युद्धात ४२ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ल्यांच्या २६६ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यातील ८५१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी