गोल पोस्ट महाराष्ट्र राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना सोडले घरी

राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना सोडले घरी

मुंबई, दि. २४ मे २०२०: देशात कविड-१९ चे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातही राज्यात त्याचा सर्वात जास्त प्रभाव बघण्यास मिळत आहे. राज्यातील कविड-१९ बाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. काल २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल रात्री पर्यंत ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्याच बरोबर ४७ हजार १९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version