नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२१: देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आज दिलेल्या लसीच्या मात्रांनंतर १४.५ कोटी लसीच्या मात्रा देण्याचं काम झालं आहे. काल रात्री आठ वाजेपर्यंत ३१ लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या. आठ वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आजपर्यंत एकूण १४,५०,८५,१११ लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आलीय.
यात, ९३,२३,४३९ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि ६०,५९,०६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आलीय. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी १,२१,००,२५४ जणांना पहिली मात्रा, तर ६४,११,०२४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आलीय. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ४,९२,७७,९४९ लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि २६,७८,१२१ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ५,०५,३७,९२२ लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि ८६,९८,१०७ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आलीय.
काल, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या १०१ व्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण ३१,७४,६८८ लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी, १९,७३,७७८ लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि १२,००,९१० लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याचे प्राथमिक आकडेवारीत म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे