पिंपरी चिंचवडमध्ये आठ दिवसांत १४ कोरोना रुग्ण, काळजी घेण्याचं आवाहन

3

पिंपरी चिंचवड, ०६ ऑगस्ट २०२२: पिंपरी चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने डोकं वर काढलं आहे. गेल्या आठ दिवसात १४ जणांना लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले आहे. दोन संशयितांचा मृत्यु झालाय. त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैधकीय विभागाची चिंता वाढलीय.

२०१९ मध्ये १९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. कोरोनापाठोपाठ पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोकं वर काढल्याने डॉक्टरांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. शहरात आधीच डेंग्यू, चिकुनगुन्या, तीव्रताप, थंडीचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहान वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील यांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूसह ताप, सर्दी, पोटदुखी या आजाराने नागरीक त्रस्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांनी ग्रासले आहे. सरकारी दवाखान्यांबरोबरच छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

त्यामुळे आजारांची लक्षणे दिसताच अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे अवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा