१४ वर्षाच्या मुलानं पळवली ११ वर्षाची गर्लफ्रेंड…!

न्यूयाॅर्क, २१ नोव्हेंबर २०२०: आजच्या आधुनिक जगात काय होईल सांगता येत नाही.महाशक्ती देशाचे प्रेसिंडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला तर जो बायडेन हे नवे राष्ट्राध्यक्ष झाले.या सगळ्या नाटकी राजकारण आणि निकालानंतर अमेरिकेत अजून एक मजेशीर घटना घडली आहे.

अमेरिकेतील मुलं हे जरा जास्तच हुशार असल्याचं पहायला मिळालं आहे.”प्रेम” निसर्गानं दिलेली एक सुखद देणगी. पण, आजच्या काळात प्रेमकमी आणि…..! न्यूयाॅर्क मधील केविन फिगुरोस या १४ वर्षीय मुलानं अभ्यास व खेळण्या बागडण्याच्या वयात एक फार मोठा पराक्रम केला. त्यानं ११ वर्षाची गर्लफ्रेंड पटवली.आताची मुलं जरा जास्तच फास्ट आहेत ही गोष्ट काही नवीन नाही. त्यानं गर्लफ्रेंड पटवली इथ पर्यंत ठिक होतं. पण, नंतर त्यानं तिला आपल्या घरापासून तब्बल १९०० किलोमीटर दूर १५० किमी च्या स्पीडनं पळवून घेऊन गेला.

या पराक्रमासाठी त्यानं वडिलांच्या मिनि-व्हॅनचा वापर केला. आयोवा शहरामधे ते दोघे सापडले. १२ नोव्हेंबर रोजी केविनने घरातून पळून जाण्याचं कृत्य केलं आणि रविवारी ते दोघे सापडले. पण, या सर्व प्रेमाच्या जांगडगुत्यात अमेरिकेतील प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. जे तेथील यंत्रणांवर थेट हल्ला चढविताना दिसतात.

आता घडलेल्या या घटनेमुळं मुलांच्या अश्या मानसिक परिस्थितीला कोण जबाबदार? हा प्रश्न उभा राहत आहे. मुळात लहानपणापासूनच प्रत्येक देशात त्यांच्या विचारसरणी ने संस्कार करण्याची पद्धत आहे. पुर्वी मुलांच्या संगोपना विषयी एक काळजी दडलेली असायची. पण, हल्ली बदलत्या काळानुरुप या बाबतीत मोठ्या प्रमाणात पालकांमधे हालगर्जीपणा दिसून येत आहे.

मुळात ज्या वयात मुलांना अभ्यास, खेळण्या व्यतिरिक्त कुणाच्या सोबतीची गरज आसते तर ती म्हणजे त्यांच्या आई वडिलांची पण या आधुनिक काळात पालकांनीच ती जबाबदारी मोबाईल, व्हिडिओ गेम, गॅजिट यांना दिली ज्या मुळं ते दिशाहीन झाले. मान्य आहे बदलत्या काळानुसार बदल गरजेचा पण तो किती हे मात्र मानवाच्या हातात आहे. केविन फिगुरोस चे कृत्य हे अनेकजणं हासणावारी घेऊन जातील खरे पण अश्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार नाही केला तर मग मात्र असे किती केविन निर्माण होतील आणि याला पुढं कोण जबाबदार राहतील याचं उत्तर समोर असून हतबलते शिवाय पर्याय उरणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा