मंत्रालयातील १४०० अधिकारी, कर्मचारी पोलिसांबरोबर कर्तव्यावर

6

मुंबई, दि.२०मे २०२०: मुंबईमधील पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारकडून मंत्रालयातील १४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांची ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये ४० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत हा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत काढण्यात आला आहे.

याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी त्यांना पोलीस स्टेशनला नियुक्ती द्यावी. तसेच त्यांना कामाचे वाटप करावे. तसेच अन्य प्रशासकीय कामे देखील आवश्यकतेनुसार देण्यात यावीत, असे या आदेशात म्हटले आहे.

या आदेशा अनव्ये म्हणजेच १९ मे पासून मंत्रालयातील कामकाजातून कार्यमुक्त करण्यात येत असून, मंत्रालयीन विभागांनी स्वतंत्रपणे कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या संदेशानुसार नेमणूक केलेल्या ठिकाणी त्यांनी कर्तव्यावर हजर व्हावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याने त्यांनी रुजू होणे अनिवार्य आहे.

पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांनी रुजू न होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ सामान्य प्रशासन विभागाला कळवावी. रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुध्द नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल. तसेच सदर अधिकारी/ कर्मचारी भारतीय दंड संहिता १८६० (४५) कलम १८८नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यास पात्र राहतील, असे ही या आदेशात म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा