नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२० : दिल्लीमध्ये अटक केलेल्या इसिस संघटनेशी संबंधित दहशतवाद्याने विशेष कक्षासमोर एक खळबळजनक खुलासा केला आहे. दिल्ली मध्ये कोणत्या ठिकाणी स्पोट घडवून आणणार होता याबाबत त्याने खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की, अटक केलेला दहशतवादी युसुफने चौकशी दरम्यान सांगितले की, बॉम्ब कधी लावायचा व कधी स्पोट घडवून आणायचा याबाबत तो त्याच्या मालकाच्या इशाऱ्याची वाट पाहत होता. तथापि, तो १५ ऑगस्ट रोजी याची तयारी करीत होता, परंतु सुरक्षा व्यवस्था पाहता त्याने आपली ही मोहीम पुढे ढकलली.
हा स्फोट दिल्ली हादरविण्याच्या तयारीत होता
त्याचवेळी त्याने दिल्लीच्या कोणत्या भागात बॉम्बस्फोट करायचे आहे हे देखील सांगितले. दिल्लीच्या हाय फूडफॉल भागात (अधिक गर्दीचा परिसर) बॉम्ब लावून जास्तीत जास्त विनाश करण्याचा हेतू होता, जेणेकरून बॉम्ब स्फोटात अधिकाधिक लोकांचे नुकसान झाले असते. फिदाईन ज्याला हे लोक त्यांच्या भाषेत वुल्फ अटॅक असे म्हणतात. म्हणजेच सरळ भाषेत म्हणायचं झालं तर आत्मघाती हल्ला. अशाच प्रकारचा हल्ला करण्याचा हेतू युसुफचा होता. परंतु, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या प्रयत्नामुळे हा कट विफल करण्यात यश आले.
अटक केलेला दहशतवादी कोण आहे
मुस्तकीम उर्फ अबू युसूफ मूळचा उत्तर प्रदेशमधील बलरामपूरचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, चार काडतुसे, दोन प्रेशर कुकर आणि एक दुचाकी जप्त केली आहे. प्रेशर कुकरमध्ये १५ किलो आयईडी (सुधारित विस्फोटक डिव्हाइस) भरले गेले होते. शनिवारी सकाळी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) च्या बॉम्ब विल्हेवाट पथकाने हा बॉम्ब अक्षम केला. त्याचवेळी दुचाकीकडे बनावट नंबर प्लेट होती. ही चोरलेली दुचाकी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांच्या शोधात दिल्ली, लखनऊ, बलरामपूर जिल्ह्यात पोलिस छापा टाकत आहेत. विशेष कक्षाने मुस्तकीम याला न्यायालयात हजर केले असून आठ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी