अमृतभारत रेल्वेस्टेशन योजनेंतर्गत १५ स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार, प्रवाशांकडून सूचना मागवल्या

मुंबई, २ ऑगस्ट २०२३ : मध्य रेल्वेच्या १५ रेल्वे स्थानकांचा रेल्वे मंत्रालयाच्या अमृतभारत स्टेशन योजनेंतर्गत सुविधा वाढविण्यासाठी पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सल्ला मागविण्यात आला आहे. पंधरा स्थानकांसाठी ईमेल आयडी किंवा ट्वीटरवर हॅश टॅग @drmmumbaicr वर सूचना मागविण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेवर दररोज १४००० मेल-एक्सप्रेस धावत असून २.२५ कोटी प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. देशभरात ७,५०० रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवाशांना सेवा देत आहे. आता रेल्वे कडून अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत महत्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. तसेच ७६ रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये देखील वाढ करण्यात येत आहे.

या पुनर्विकास कामांमध्ये रेल्वे स्थानकात अतिरिक्त पादचारी पुलांची निर्मिती करणे.आवश्यक तेथे लिफ्ट आणि सरकते जिन्यांची निर्मिती करणे.सर्क्यूलेटींग एरिया आणि स्थानकातील गर्दीचे विभाजन करणे.स्थानकातील वेंटीग हॉल आणि टॉयलेटची गुणवत्ता वाढविणे.स्थानकातील प्रकाश व्यवस्था दुरुस्त करणे.स्टेशनमधील फलक, टेनचे इंडीकेटर्स, कोचचे इंडीकेटर्सची गुणवत्ता वाढविणे. स्थानकातील पार्किंगच्या व्यवस्थेत वाढ करणे. प्लॅटफॉर्ममधील छप्परांची दुरुस्ती आणि वाढ करणे.आदी सुविधा वाढविण्यात येणार आहेत.

प्रवाशांसाठी सेवा आणि सुविधेत वाढ करण्यासाठी स्टेक होल्डरकडून सूचना मागविण्यात येणार आहे. प्रवासी, रेल युजर, प्रवासी संघटना अशा विविध घटकांकडून स्थानकात सुधारणा करण्यासाठी सूचना मागविल्या होत्या. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत या स्थानकांचा विकास केला जाणार आहे. या योजने अंतर्गत भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपूरी, वडाळा रोड, सॅंडहर्स्ट रोड या पंधरा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा