ब्रिटन, १८ डिसेंबर २०२०: ब्रिटन मधे एका दोन महिन्याच्या बाळाला १६ कोटीचं इंजेक्शन देण्यात येणार आहे. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण, ही खरी गोष्ट आहे. जन्मतहा बाळाला आजार होणं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या जगात नाही. मात्र, ब्रिटन मधल्या बाळा बरोबर आसं घडलं आहे.
मात्र, आई वडील हे सध्या या इंजेक्शन साठी डोनेशन जमा करत असून आतापर्यंत त्यांच्याकडं दोन कोटी जमा झाले आहेत. तर आणखी पैसे मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
बाळाला कोणता आजार….
बाळाला झालेल्या आजाराचं नाव आहे Genetic Spinal Muscular Atrophy (SMA) हा एक जगातील खतरनाक आजार मानला जातो. रुग्णांच्या शरीरात एसएमएन -१ (SMN -1) जिन्सची कमतरता असते. या आजारावरील उपचार हे कॅन्सरपेक्षाही महागडे आहेत.
ब्रिटनमध्ये या आजाराचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. ब्रिटनमध्ये दरवर्षी ६० मुलांना जन्मत: हा आजार असतो. या रुग्णांच्या छातीमधील स्नायू कमकुवत असतात. त्यामुळं त्यांना श्वास घेताना मोठा त्रास होतो. लहान मुलांमध्येच या आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हा आजार जर वाढल्यास मुलाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.
महागडं इंजेक्शन ?
या आजारावरील इंजेक्शनचं नाव आहे झोलगेनेस्मा. (Zolgensma) हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जपानमधून मागवण्यात येते. या आजारानं पीडित असलेल्या रुग्णाला फक्त एकदाच हे इंजेक्शन देण्यात येते. त्यामुळंच हे इतकं महाग आहे. ब्रिटनमधल्या मुलांना हा आजार होत असला तरी त्याचे औषध ब्रिटनमध्ये मिळत नाही. या आजारावर तीन वर्षांपूर्वी कोणतेही उपचार नव्हते. भरपूर संशोधन आणि टेस्टिंग केल्यानंतर २०१७ मध्ये यावरील औषध शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. त्यानंतर या इंजेक्शनची निर्मिती सुरु झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव