गोल पोस्ट महाराष्ट्र महाडमधील बिरवाडी काळीज येथील १६ वर्षीय तरुणीची आत्महत्या

महाडमधील बिरवाडी काळीज येथील १६ वर्षीय तरुणीची आत्महत्या

महाड १८ मार्च २०२४ : महाड एमआयडीसी हद्दीमध्ये आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिरवाडी काळीज येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. रजनी सोनू शर्मा सध्या राहणार काळीज-खरवली मूळ राहणार उत्तर प्रदेश असे तरुणीचे नाव असून घरामध्ये कोणीही नसताना या तरुणीने कॉटनच्या दोरीच्या साह्याने फॅनच्या हुकला दोरी बांधून आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : नितेश लोखंडे

error: Content is protected !!
Exit mobile version