पुणे, १२ नोव्हेंबर २०२०: शिवाजीनगर येथील सीओइपी जम्बो कोविड रुग्णालयामधून आज १७ कुष्ठरोगी दिवाळीच्या पूर्व संध्येला पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील सीओइपी जम्बोकोविड रुग्णालयामधून आज १७ कुष्ठरोगी दिवाळीच्या पूर्व संध्येला पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
यावेळी मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग सौरभ राव यांच्या हस्ते सर्व रुग्णांना दिवाळी निमित्त मिठाईचा बॉक्स, सानीटायझर व मास्क देऊन घरी सोडण्यात आले.
मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग सौरभ राव यांनी सर्व ज्येष्ठ रुग्णांशी संवाद साधून त्यांना रुग्णालयातून देण्यात येत असलेल्या सुविधा, औषधोपचार बाबतची संपूर्ण माहिती घेतली. तसेच सर्व डॉक्टर, नर्सेस व अधिकारी यांचे कौतुक केले.
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल यांनीमहात्मा फुले योजने अंतर्गत किती प्रस्ताव तयार करण्यात आले याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. यावेळी डॉ. किरण शहा, डॉ. पद्माकर पंडित, डॉ. गणेश साने, डॉ. कपाले इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे