पुणे, दि. ३ मे २०२० : शहरात ‘डॉक्टर आपल्या दारात’ उपक्रमा अंतर्गत ५५ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून आजवर सुमारे ५५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर औषध उपचारही करण्यात आले. या तपासणी दरम्यान १७० कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
असे आहे उपक्रमाचे स्वरूप:
महानगरपालिकेने बीजेएस (भारतीय जैन संघटना) व फोर्स मोटर्स यांच्या सहकार्याने १ एप्रिलपासून मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोळ्यांचा दाह, सूज, नाक गळणे या आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिली जातात. एका मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनमध्ये १ डॉक्टर, १ रेडिओलॉजिस्ट, १ नर्स, अन्य २ कर्मचारी असे ५ जणांचे पथक
कार्यरत असते.
न्यूज अनकट प्रतिनिधी