इंदापूर येथे रक्तदान शिबीरात १७५ बाटल्या रक्त संकलित

इंदापूर, दि. ३० मे २०२०: कोरोना सारख्या महाभयंकर रोगामध्ये सध्या रक्ताचा भीषण तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील वारंवार आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले होते. राजेश टोपे यांनीदेखील जनतेला रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आव्हान केले होते. याच पार्श्वभूमीवर सामाजिक हित जपत इंदापूर शहरातील धनंजय वाशिंबेकर मेमोरियल फाउंडेशन यांचे वतीने शुक्रवारी (दि.२९) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये जवळपास १७५ रक्तपिशव्या संकलित झाल्या. या संकलित झालेल्या रक्तपिशव्या आपण राज्य सरकारला सुपूर्द करणार असल्याचे फाऊंडेशनचे भावेश ओसवाल यांनी न्यूज अनकटशी बोलताना सांगितले.

यावेळी कार्यक्रमास धनंजय वाशिंबेकर मेमोरियल फाऊंडेशनचे सोमनाथ खरवडे, अतुल शेटे, नगरसेवक पोपट शिंदे, व्यंकटेश वाशिंबेकर आणि राहुल चित्राव आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा