मंचर मध्ये एकाच दिवशी तब्बल १७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आंबेगाव, १० सप्टेंबर २०२०: आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे बुधवार दि ९ रोजी तब्बल १७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून प्रशासनाच्या वतीने पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा नवीन प्रयोग राबवून,आज १००१ टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये १७६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असुन पुढील काळात रुग्णांची संख्या कमी होण्यास या नव्या प्रयोगाने शक्य होणार आहे.

मंचर शहरात पॉझिटिव रुग्णांची दिवसेंदिवस  वाढती संख्या लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांच्या मदतीने जिल्ह्यात प्रथमच नवीन प्रयोग राबवून आज मंचर शहरात संपूर्ण नागरिकांचे सर्वेक्षण करून यात तापमान व काही आजार आहे का याची घरोघरी जावून चौकशी करून, आजार असणाऱ्या,व संशयित नागरिकांची तात्काळ रॅपिड टेस्ट, स्वेब टेस्ट करून नागरिकांना तात्काळ कोरोना संदर्भात अहवाल माहिती उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आंबेगाव तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मंचर शहराचे प्रशासक जयराम लहामटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे,ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, मंचर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधित रुग्णांचा वाढता आलेख नियंत्रित करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सारंग कोडीलकर, यांच्या मार्गदर्शनाने मंचर शहरात दि.९ सप्टेंबर रोजी सर्वेक्षण मोहीम सुरू केली होती.

यात १११ पथके तयार करून प्रत्येक पथकात पाच ते सहा मदतनीस नेमून संशयित रुग्णांची तात्काळ रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यासाठी मंचर मधील ६ प्रभागांमध्ये ६ टेस्टिंग सेंटर तयार केले होते. या सर्वेक्षणासाठी ११ पर्यवेक्षक ६ अँटीजेन स्वैब कलेक्शन सेंटर, ३० टेस्टिंग स्टाफ, १२ पोलिस कर्मचारी, ३ ऍम्ब्युलन्स, अतिरिक्त २० कर्मचारी यांची नियुक्ती केली होती. तर काही स्वयंसेवकांची देखील मदत घेतली आहे.

या टेस्टसाठी मंचर परिसरातील खाजगी लॅबचे सहकार्य प्रशासनाला मिळाले असून, बहुतेक मंचरकर नागरिक स्वतःहून घराबाहेर पडून या सर्वेक्षण मध्ये सामील होऊन आपल्या टेस्ट करत होते.

या प्रकारच्या सर्वेक्षण व तात्काळ येणाऱ्या अहवालामुळे आज जरी मंचर शहराचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मोठा असला तरी पुढील काळात मंचर कोरोना मुक्त होण्यास मदत होणार आहे.

असाच सर्वेक्षण कार्यक्रम या पुढील काळातही जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे राबवण्यात येईल असे प्रशासनाच्या वतिने सांगण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनीधी : साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा