गोल पोस्ट गुन्हा १९ वर्षीय मुलीने केला स्वतःच्या आईचा खून

१९ वर्षीय मुलीने केला स्वतःच्या आईचा खून

हैद्राबाद(वृत्त संस्था) : येथे एकापेक्षा जास्त मुलांबरोबर प्रेमसंबंध ठेवण्यास विरोध करणार्‍या आईचा १९ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची खळबळजनक घटना हैदराबाद येथील हयातनगर (द्वारका कॉलनी) येथे घडली आहे.
रंजिता (वय ३८) यांचा त्यांच्याच १९ वर्षीय मुलींन खून केला आहे. एवढच नव्हे तर आईचा मृतदेह घरातील एका रूममध्ये लपवून ठेवून तिने आणि तिच्या प्रियकरानं दुसर्‍या खोलीत शरीरसंबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे.किर्ती रेड्डी असे त्या मुलीचं नाव असून ती पदवीच्या दुसर्‍या वर्षात शिकते आहे. तिने तिच्या मित्राच्या मदतीने आई रंजिता यांचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version