कोल्हापूरात मनपास्तरीय शासकीय शालेय १९ वर्ष मुले आणि मुलींची क्रिकेट स्पर्धा संपन्न, महावीर जुनिअर कॉलेज ठरले अजिंक्य

9

कोल्हापूर, ११ नोव्हेंबर २०२३ : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित, मनपास्तर शासकीय शालेय १९ वर्ष मुले व मुली क्रिकेट स्पर्धा सन २०२३-२४ हि येथील शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर आयोजीत करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट अंपायर असोसिएशनचे तांत्रिक सल्लागार तसेच सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील यांचे सहकार्याने या स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धा आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव आणि स्पर्धा समन्वयक शिवाजी कामते यांनी केले.

स्पर्धेत १९ वर्ष मुले व मुली गटात महावीर जुनिअर कॉलेज अजिंक्य ठरले आहे. या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे आहे.

स्पर्धा निकाल :
१९ वर्ष मुले : सेमी १ : महावीर जुनिअर कॉलेज वि वि डॉ. डी.वाय.पाटील जुनिअर कॉलेज, ताराबाई पार्क
प्रथम फलंदाजी महावीर जुनिअर कॉलेज १०९ रन ८ ओवर
दुसरी फलंदाजी डॉ. डी. वाय. पाटील जुनिअर कॉलेज, ताराबाई पार्क ७२ रन ८ ओवर

सेमी २ : विवेकानंद जुनिअर कॉलेज वि वि शांतिनिकेतन स्कूल
प्रथम फलंदाजी शांतिनिकेतन स्कूल ४७ रन ८ ओवर
दुसरी फलंदाजी विवेकानंद जुनिअर कॉलेज ४८ रन ६ ओवर

अंतिम सामना : महावीर जुनिअर कॉलेज वि वि विवेकानंद जुनिअर कॉलेज
प्रथम फलंदाजी विवेकानंद जुनिअर कॉलेज ४९ रन ८ ओवर
दुसरी फलंदाजी महावीर जुनिअर कॉलेज ५० रन ४ ओवर

विजयी महावीर कॉलेज संघ : वीरेंद्र चव्हाण, साईप्रसाद माने, सत्वशील हळदणकर, संदिप मन्ना, वासिम मुल्लानी, वरद खोडवे, रुद्र लोंढे, यतिराज पाटोळे, आलोक कानेटकर, आदित्य पाटील, आकार राणे, अभिषेक आंब्रे, अनुराग मेस्त्री, शुभम पाटील, सोहम काटकर, संस्कार पाटील क्रीडा शिक्षक प्रा. रोहित पाटील, प्रा. स्वप्नील खोत.

१९ वर्ष मुली :
सेमी : महावीर जुनिअर कॉलेज वि वि श्री शहाजी जुनिअर कॉलेज
प्रथम फलंदाजी महावीर जुनिअर कॉलेज ६३ रन ८ ओवर
दुसरी फलंदाजी श्री शहाजी जुनिअर कॉलेज ३१ रन ८ ओवर

अंतिम सामना : महावीर कॉलेज वी वी कमला कॉलेज
प्रथम फलंदाजी महावीर कॉलेज ९० रन ८ ओवर
दुसरी फलंदाजी कमला जुनिअर कॉलेज ३८ रन ८ ओवर

विजयी महावीर कॉलेज संघ : अमृता कोळी, ईश्वरी राणे, ऋतुजा घबक, निकिता खाडे, निधी शंभवानी, पूर्वा लवंगारे, मिस्बा सय्यद, वसुधा देशमुख, वैष्णवी शिरगावे, सानिका धोंड, सानिया कांबळे, सृष्टी पोवार, स्नेहा खाडे, ऐश्वर्या पोवार, ऐश्वर्या मोरे, वैजू जगताप क्रीडा शिक्षक : प्रा. रोहित पाटील, प्रा. स्वप्नील खोत

मुलांचे प्रथम, द्वितीय, तृतीय विजयी संघास प्रा.डॉ. बाबासो उलपे (बी.ओ.एस.) चेअरमन शारीरिक शिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे मार्फत ट्रॉफी देण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा