पिस्तूल दाखवून जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याबद्दल भाईंदरमध्ये २ जणांना अटक

मुंबई १७ जून २०२३: भाईंदरमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन तरुणांनी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पिस्तूल दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग आणि अपहरणाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून, दोन्ही आरोपींना अटक केली.

भाईंदर येथे राहणाऱ्या पीडितेने सांगितले की, आरोपी मुनव्वर मन्सुरी हा तिचा ओळखीचा आहे. १२ जून रोजी रात्री ८.४० च्या सुमारास त्याने तिला इमारतीच्या गच्चीवर बोलावले. त्याने तिला बुरखा, चेन, अंगठी आणण्यास सांगितले. पीडितेने यासाठी नकार दिल्यावर आरोपीने तीला धमकावत बनावट पिस्तूल दाखवले आणि बुरखा घालून इस्लाम स्वीकारला नाही तर गोळ्या घालण्याची धमकी दिली.

आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने तिच्या आईला या प्रकरणाची माहिती दिली. पीडितेच्या आईने पोलिसांना याबाबत कळवले. भाईंदर पोलिसांनी आरोपी मुनव्वर अन्सारी (२०) आणि अझीम मन्सूरी (२०) यांच्याविरुद्ध विनयभंग, अपहरण आणि पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल करून अटक केली. डीसीपी जयंत बजबळे यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे प्रकरण निव्वळ खोडसाळ आहे की यामागे षडयंत्र आहे, याचा शोध घेतला जात आहे. सध्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, स्थानिक लोकांनी सांगितले की, पीडितेच्या आईकडून माहिती मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींना लोकांनी पकडून बेदम मारहाण केली, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये ही वस्तुस्थिती नोंदवली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा