नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२१: भारतीय लष्कराने सिक्कीमच्या ना कुला येथे भारत आणि चीनमधील सैनिकांमधील चकमकीविषयी एक निवेदन जारी केले आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामधील हा किरकोळ संघर्ष असल्याचे सैन्याने म्हटले आहे. स्थानिक पातळीवरील कमांडरांनी हा वाद त्वरित निकाली काढला. भारतीय सैन्याने सांगितले की २० जानेवारी रोजी सैन्य दलातील जवानांमध्ये किरकोळ संघर्ष झाला.
२० जानेवारी रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमकीची घटना सिक्कीमच्या ना कुलाची आहे. सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नाला भारतीय सैनिकांनी विरोध केला. प्रथम त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर चिनी सैनिक धक्काबुक्की वर उतरले.
भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि चिनी सैनिकांना तेथून हुसकावून लावले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत सुमारे २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत, पण गलवान प्रमाणेच चीनने हे कृत्य केल्यानंतर आपली नाचक्की जगासमोर येऊ नये म्हणून मौन बाळगले आहे. या चकमकीत चार भारतीय सैनिकही जखमी झाले.
नाकुला सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमकीची घटना नवीन आहे. गेल्या वर्षीही मे महिन्यात जेव्हा दोन देश कोरोना संकटाला सामोरे जात होते तेव्हा चिनी सैनिकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते धक्काबुक्की करू लागले. भारतीय सैन्यानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे