20 फूट उंची, 9500 किलो वजन… नवीन संसद भवनावर विशाल अशोक स्तंभ, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण

नवी दिल्ली, 11 जुलै 2022: नवीन संसद भवनाचं काम जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन संसद भवनाच्या छतावरील 20 फूट उंच अशोक स्तंभाचं अनावरणही केलं. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. पुढील हिवाळी अधिवेशन नवीन संसद भवनात घेणार आहे.

दुसरीकडं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेताना कामात गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली. अशोकस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचं वजन 9500 किलो आहे जे कांस्य पासून बनलेले आहे. त्याच्या सपोर्ट साठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची आधारभूत रचना देखील तयार करण्यात आलीय.

2020 मध्ये, नवीन संसद भवन बांधण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्ट्सकडून 971 कोटी रुपये प्राप्त झाला. सरकारने या इमारतीसाठी ऑक्टोबर 2022 ची अंतिम मुदत निश्चित केली होती आणि यावर्षी संसदेच्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याचं लक्ष्य ठेवलं होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीडब्ल्यूडीने संसदेच्या नवीन इमारतीचा खर्च वाढत असल्याची कारणं दिली आहेत. यामध्ये स्टीलच्या उच्च किमतीचा समावेश आहे, नवीन संसद भवन सिस्मिक झोन 5 नियमांनुसार बांधलं जात आहे.

याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील खर्चही वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक, संसद भवनात आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याशिवाय सर्व खासदारांच्या टेबलवर टॅब्लेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मंत्र्यांच्या दालनात आणि बैठकीच्या खोलीत हायटेक उपकरणांचा वापर केला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा