यूएन मध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्यासाठी २० टन औषध सामग्री रवाना

नवी दिल्ली, दि. १९ जुलै २०२०: १९४८ पासून भारतीय सैन्याने युनायटेड नेशन मध्ये कैनात आहे. या सैन्याचे काम जगातील विविध देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे असते. याअंतर्गत तब्बल दोन लाखाहून अधिक भारतीय सैन्य युनायटेड नेशन च्या शांती सैन्यामध्ये कार्यरत आहेत. सध्या जगभरात कोविड -१९ चा प्रभाव चालू आहे. याची दक्षता घेत भारतीय सैन्याने व वायुदलाने जवळपास २० टन कोविड -१९ शी संबंधित सामग्री व औषधे युनायटेड नेशन पीस कीपिंग फॉर्स अंतर्गत तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी पाठवले आहेत.

साऊथ सुदान आणि काँगो येथे ही औषध सामग्री पाठवण्यात आले आहे. युनायटेड नेशन पीस कीपिंग फॉर्स च्या अंतर्गत तैनात असलेल्या भारतीय सैन्यांनी व पोलिसांनी आतापर्यंत ४३ मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. युनायटेड नेशन पीस स्किपिंग फोर्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली सैन्य तैनाती या पीस कीपिंग फॉर्स मध्ये केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा