नवी दिल्ली, ७ जुलै २०२० : पंतप्रधान कार्यालयातील माहिती सुरक्षा अधिकारी श्री. गुलशन राय यांनी काल सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत देशात सायबरच्या घटनांमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे, परंतु त्या चीनी हैकर्सवर दोषारोप ठेवता येणार नाहीत. मुंबईतील पेमेंट्स कंपनी ईपीएसने आयोजित एका संवादात बोलताना ते म्हणाले की, कोविड -१९ मधील लॉकडाऊनमुळे सेवा क्षेत्रातील काही लोक घरातून काम करत असल्याने घटनेत वाढ झाली आहे. ते म्हणाले की लोक कुठलाही विचार न करता कोणत्या ही सुरक्षितेचा विचार न करता अनेक अॅप्स मोठ्या प्रमाणात डाउनलोड करीत आहेत.
श्री राय म्हणाले की अशा काही संस्था आहेत ज्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत आणि सायबर हल्ले रोखत आहेत. त्यांनी सांगितले की लोकांना जे काही डाउनलोड करायचे असेल तर त्यांनी अत्यंत सावध राहून केवळ वेरिफाईड अॅप्सच डाउनलोड करावे. जग हे चिनी उत्पादनांवर अवलंबून असलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की चीन उत्पादन क्षेत्रात जगातील अग्रणी देश आहे बरेच देश त्याच्या कडून ही उत्पादने खरेदी करतात. परंतू आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली आहे. ज्यामुळे देश स्वावलंबी होण्यास मदत होईल .
अमेरिका आणि युरोपियन देशांसह इतर देशही चीनवर अवलंबून आहेत परंतू आता तेही हे अवलंबन कमी करण्याच्या मार्गावर आहेत, असे श्री राय म्हणाले. रिफायनरीज आणि उर्जा प्रकल्पांसारख्या गंभीर पायाभूत सुविधांच्या बाबतीत श्री. राय म्हणाले की भारतातील बर्याच सुविधा विस्तीर्ण इंटरनेटशी जोडलेल्या नाहीत परंतू अखेरीस कार्यक्षमतेच्या गरजा त्यांना कनेक्ट होण्यास भाग पाडतील .
न्यूज अनकट प्रतिनिधी